ती

Started by rushi@rugvedi, January 04, 2016, 07:17:19 PM

Previous topic - Next topic

rushi@rugvedi

एकटक बघावे, नजरेन नाही हटावे ,
डोळे मिटताच तिने समोर उंभे रहावे,
स्वप्नात यावे,शेजारी बसावे ,
हळूच मला बाहूत घ्यावे,

खुदकन हसावे , जरासे लाजावे ,
काहीतरी कानात हळुच सांगावे,
गुलाबा सारखे दिसावे, परी सारखे सजावे,
बघताच तिला घायाळ होऊन जावे.

गोड गोड बोलताना तिच्या नाझुक ओठाकडे पाहावे ,
तिच्या त्या नाझुक शब्दांना ओंजळीत घ्यावे,
एकटक बघावे, नजरेन नाही हटावे ,
डोळे मिटताच तिने समोर उंभे रहावे,

ऋषिकेश सोनवणे
९९२३२०००८०

Devidas Shelke