सांग माझ्या मना...

Started by शिवाजी सांगळे, January 05, 2016, 10:14:26 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सांग माझ्या मना...

आठवतं का रे तृुला?
सांग माझ्या मना,
फुटभर शरीर, तळहातावरचं!
लुकलुकते डोळे,
आवळलेल्या मुठी न्
आळस देत्या गोब-या गालांचं?

आठवतं का रे तृुला?
स्वप्नवत बाल्य तुझं,
आई बाबाला जे सुखवायचं!
बोल बोबड्या शब्दांनी
नागड्या उघड्या शरीराने
रांगता कधी दुडक्या चालीचं!

थोडं मोठ झाल्यावर
आठवतं का रे तृुला?
बाबाची सेम नक्कल करतांनाचं!
लुडबुड करतां कामात
आईच्या हातून नकळत
पाठीत प्रेमळ धपाटा खल्याचं?

काहीच नव्हतं तेव्हा
ज्युनियर आणि सिनियर
थेट पहील्या वर्गात बसल्याचं!
आठवतो का रे तृुला?
पुढचा सारा प्रवास?
अगदि बारावी पास केल्याचं?

नंतर तर काय, तू
झालासच रे मोठा,
बाबाच्या रेझरने दाढी केल्याचं!
आठवते का रे तृुला?
काँलेजची ती दंगामस्ती
ग्रँज्युएट होता, फ्लर्टींग केल्याचं?

नोकरीचा पहिला दिवस
आठवतो का रे तृुला?
कुुणा शिवाय एकट्याने जेवल्याचं!
घरच्यांसाठी आणलेली
त्यांच्या आवडीची गीफ्ट
न् स्वतःला काहीच न आणल्याचं?

आठवते का रे तृुला?
तीची तुझी पहिली भेट
बस स्टाँपवर चुकामुक झल्याचं?
राग तर आला होता
पण भेटायचचं होतं
पपस्परांना नंतर साँरी म्हटल्याचं?

बोललास घाबरत घरी
आई तर रूसली होती,
तरीही तीला कनव्हींस केल्याचं !
आठवते का रे तृुला?
बाबा,भाऊ,बहिणीने
हसत, हसत तुला चिडवल्याचं !

मिळाली संमती सगळ्याची
तयार होते तीच्याही घरचे
शुभ मुहुर्तावर लग्न झाल्याचं !
क्षण सोनेरी अनुभवलेले
आठवतं का रे तृुला?
श्वासात श्वास तेव्हा विरघळल्याचं !

सरलं जीवन रे सारं
आयुष्याचं रणं करून
कुटुंबासाठी अथक झुंजल्याचं!
आठवते का रे तृुला?
साधी भोळी सहचारीणी
सोबत तीच्या वाटचाल केल्याचं!

चांदी पिकू लागली
आताशा तुमच्या कडे
कळलं, पिलांची पाखरं झाल्याचं !
वडीलधारी गेली सोडून न्
पाखरं रमली आपल्यात
संध्याकाळचं जाणवणं एकटेपणाचं?

आठवतं का रे तुला?
मंदिराच्या पायरीवरून
आयुष्याची एकएक वर्ष सरल्याचं!
चाहुल लागता पैलतीराची
राहुन गेलेलं नामस्मरण
डोळे मिटुन मनोमनी केल्याचं?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९