तू हसलीस कि वाटत..

Started by Vinod Thorat, January 06, 2016, 12:29:32 AM

Previous topic - Next topic

Vinod Thorat

तू हसलीस कि वाटत काळ्या शार रात्री प्राजक्ताचा सडा पडलाय अंगावर अन् त्याचा सुगंध ठाव घेतोय माझ्या काळजाचा !!
तू हसलीस कि वाटत आभाळातून इंद्रधनू उतरलाय तुझं सप्तरंगी चित्र काढायला माझ्या काळजावर !!
तू हसलीस कि वाटत श्रावणाची पहिली सर कोसळतेय अंगावर अन् मातीचा गंध भरून राहिलाय हृदयात माझ्या !!
तू हसलीस कि वाटत कोसळतेय एखादी वीज धरणीवर उजळून टाकत आसमंत सारा !!
तू हसलीस कि वाटत थांबवा हा क्षण इथेच अन् मी असंच पाहत राहावं तुझ्याकडे अगदी जगाच्या अंतापर्यंत !!
बस् तू अशीच हसत राहा माझं अस्तित्व तुझ्यात विरून जाईपर्यंत..

Rahul Shinde



निखिल जाधव

Mi Radtoy ani tu Boltos ki asch hasat raha
bt nice yaar

Vinod Thorat

वाचा माझी नवीन कविता "तिच्या डोळ्यात हरवलाय माझ्या स्वप्नातला भारत" गंभीर कविता सेक्शन मध्ये..

sangita_4101980

Its beautiful !!!!
Khoopach Chhan aahe rachana



Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Mayur Dhobale