नजर

Started by Shraddha R. Chandangir, January 07, 2016, 12:54:10 PM

Previous topic - Next topic

Shraddha R. Chandangir

मनात उठले होते विचारांचे काहूर
सांगण्यास मी झाली होती आतुर
तितक्यात कोणीतरी दिसलं
त्यास जरा सांगून बघावं म्हटलं
.
अंतःकरणात दाटलेले ते शब्द ओठांवर आले
जणू काही धावपळीची पैज
लागल्यापरी कानांवर जाऊन धडकले
.
मनानेही सोडला मग सुटकेचा श्वास
कान आणि ओठांना म्हणू लागला
झालो रे आता मी बिंदास.
.
नजर मात्र दचकली...
जरा घाबरली....
घडलेले दृष्य परत चाचपून पहावे
म्हणून डोळ्यांस विनवू लागली.
.
डोळे ही स्मित हास्याने नजरे कडे बघू लागले.
अगं वेडे घाबरतेस कशाला म्हणून तिला विचारू लागले.
.
मनात विचार उठले
ओठांनी ते व्यक्त केले
कानांनी ऐकले
आणि सगळ्यांचा साक्षिदार, म्हणून
डोळ्यांनी ते पाहिले.
आपापली जबाबदारी पार पडली
आणि ज्याचे त्याचे कामही संपले.
.
नजरे भोवती तरी फिरत होते शंकेचे वारे
विनंती करून सवंगड्यांस म्हणत होती
माझे ऐकून तर घ्या सारे.
मुर्ख आहात रे तुम्ही तुमचे डोके आहे की खोके
न मला आजवर कोणी देऊ पाहीले
सहजासहजी धोके
.
गैरसमजाच्या चक्रव्यूहात फसले रे सारे
हे ऐकून जणू वाढत होते हृदयाचे ही ठोके.
.
नजर विचारी डोळ्यांना, कोण दिसले रे
तुम्हाला जे तुम्ही देहभान हरपून बसले?
ओठांवर ही ओरडली,
इतकेे स्वस्त होते का तुमचे शब्द
जे क्षणात देऊन चुकले?
.
मग नजर फिरली मना कडे आणि धरले त्याला धारेवर.
भिती होती न तुला जनाची मग का सुटलास मोकाट वाल्यावर?
कोण होता तो खास ज्यावर एकाएकी जडला तुझा विश्वास?
भिती नाही का तुला? होशील ना एक दिवस उदास.
.
भावनेच्या या राजनितीत डावपेच रचले जातात.
प्रामाणिकतेला बोली वर चढऊन नाती विकली जातात.
म्हणूनच शांतता ओठांवर येते.
आपलीशी वाटणारी व्यक्ति ही मग नजरअंदाज होते.
.
नजर-नजरेचा चालतो असाच खेळ.
नजर चुकली की तुटतो मेळ.
सतत विचारतात सारे का इतकी शांत असते?
वरून शांत असली तरी नजर बोलत असते.
~ अनामका (9 October 2014)
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]