बायको

Started by rushi@rugvedi, January 07, 2016, 07:15:14 PM

Previous topic - Next topic

rushi@rugvedi


बायको म्हणजे काय गणित ,
फक्त नवऱ्यालाच माहित असते,
कधी कधी साइको तर,
कधी कधी प्रेमळ असते
बायको म्हणजे काय गणित ,
फक्त नवऱ्यालाच माहित असते,

उठून सुटून बडबड असते,
कामाच्या मध्ये लुडबुड असते ,
नवरा दिवसभर काय करतो ,
याच्यावरही तिची नजर असते.
बायको म्हणजे काय गणित ,
फक्त नवऱ्यालाच माहित असते,

कधी कधी छळंत असते  तर
कधी कधी तळमळत असते,
पोरासाठी मात्र दिवसभर,
हीकडून तिकडे पळत असते ,
बायको म्हणजे काय गणित ,
फक्त नवऱ्यालाच माहित असते,

संसाराला ती साथ असते तर,
नवऱ्याचा ती हात असते ,
कितीही काही झाले तरी ,
नवऱ्याच्या ती  मनात असते ,
बायको म्हणजे काय गणित ,
फक्त नवऱ्यालाच माहित असते,


ऋषिकेश सोनवणे
९९२३२०००८०




Modify message