निरोप

Started by hmagar15, January 08, 2016, 02:17:41 PM

Previous topic - Next topic

hmagar15



तू सोबत असलास न की  माझ अस होत
मन तुझ्यात हरवत जात , माझ मलाच सापडेनास होत 
समोर पसरलेला शांत समुद्र न चंनद्रावलेली रात्र
दोघांमध्ये प्रेमाशिवाय कुणी बोलेनास होत
काळजाचा ठाव घेणारी तुझी हळवी नजर
डोळेच बोलत असतात, ओठांच शब्दांशी पटेनास होत
हात तुझा हातात घेऊन तासान तास निघून जातात
मग निरोप तुझा घेतांना मन ऐकेनास होत
तुझ ते हळूच हसणं न मला माझ्या पासून दूर नेण
मी माझीच राहत नाही न मला काही कळेनास होत
                  - हर्षदा भूषण मगर