असच असते हे प्रेम

Started by rushi@rugvedi, January 08, 2016, 08:45:51 PM

Previous topic - Next topic

rushi@rugvedi

असच असते हे प्रेम
कुणाच्या तरी आठवणी जपणार
कुणाची तरी स्वप्न दाखवणार ,
कुणाच्या तरी भावनांना श्वासात रोखणार.
असच असते हे प्रेम.

असच असते हे प्रेम
डोळ्याची मुकी भाषा समजणार
कुणाच्या तरी मनातील मधुरस चाखणार
कुणाला तरी तळहातावरील फोडाप्रमाणे जपणार.
असच असते हे प्रेम.

असच असते हे प्रेम
प्रत्येक श्वास घेताना कुणाचे तरी नाव घेणार .
कुणाच्या  तरी भेटीची अनामिक ओढ लावणार.
असच असते हे प्रेम.

असच असते हे प्रेम
कुणाशी तरी सतत भांडणार
कुणाला तरी रातभर रडवणार
कुणाशी तरी भांडून रडऊन  झाले  कि हळूच मिठीत घेणार ,
असच असते हे प्रेम

असच असते हे प्रेम
काही दिवस विरह सहन करायाल लावणार .
डोळ्यात आलेल्या अश्रुना स्वताच समजावणार
ती कधी भेटेल याची वाट पाहायला लावणार .
असच असते हे प्रेम

ऋषिकेश सोनवणे
९९२३२०००८०