दिव्य स्तंभ प्रकाशाचा

Started by विक्रांत, January 08, 2016, 09:27:49 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

ते दारही बंद होते 
हे दारही बंद आहे
पाऊलांच्या चिंधीयांना   
वेदनाच अंत आहे ||

भिजावेत पंख ऐसे
पाखरांना वाटते रे
जरी दबा मृत्यू दंश
इथे पाणवठे सारे || 

फुटाव्यात उकळ्या नि
व्यर्थ लेख मिटू जावे
नको नको आन नवे 
कोरेपन जीवा यावे ||

कुणा हव्यात चांदण्या   
रंगलेल्या मधुरात्री
झंकारल्या स्पंदनांनी
उठावे ओंकार गात्री ||

एक अंत अटळसा
जरी जीवा खुणावतो
पलीकडे वाट नवी
आत कुणी सांभाळतो ||

जगण्यास जाणायचे
भलतेच खूळ जरी
दिव्य स्तंभ प्रकाशाचा
ओघळतो गिरनारी ||


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/