या चांदण्या रात्री...

Started by Pravin Raghunath Kale, January 08, 2016, 10:16:53 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

या चांदण्या रात्री...

या चांदण्या रात्री
मनाला होते खात्री

आठवत असेल ती मला
रमवत असेल स्वतःला
आठवणीत माझ्या...

हरवतो मीही स्वतःला
तीच्या आठवणीत
या चांदण्या रात्री...

कुठेतरी अशीच अवस्था
कितीतरी प्रेमीजीवांची
अशीच विरहाची व्यथा
या चांदण्या रात्री...

        ~प्रविण.

प्रविण रघुनाथ काळे
मो. 8308793007
Www.facebook.com/kalepravinr

shamali zambare