प्रेमाचे , हे रस्ते संपायला नको होते...

Started by Poonam chand varma, January 09, 2016, 02:01:38 PM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

हे रस्ते संपायला नको होते ....

तुझ्या मागे गाडीवर बसल्यानंतर ,
हे रस्ते संपायला नको होते,
आनंदाचा या अलोकिक क्षणाना ,
पूर्ण-विराम यायला नको होते....

ते तुझे अति-वेगाने गाडीचे चालविणे ,
ब्रेकर मुळे अचानकच जोराने थाबविणे
तुझ्यावर येणारा तोल मी सांभाळणे
खरच, असा प्रवास संपायला नको होता ...

त्या तुझ्या खुल्या केसांचे उडणे
उडताना माझ्या चेहऱ्यावरती येणे
केसांची सुगंधमुळे मनचे  मुघ्ध होणे
खरच, मनाची मुघ्धता संपायला नको होती...

माझ्या प्रत्येक गोष्टीवर ते तुझे हसणे
हसताना तुझ्या डोळ्यात पाण्याचे येणे
या हास्य-अश्रूंच्या स्पर्शाने मन बहारून जाणे
खरच, हे मनाचे बहारणे संपायला नको होते....

रस्त्याच्या भटकंतीमुळे ते तुझे घाबरणे
तुझ्या घाबरण्यमुळे जीवाचे माझे जाणे
जग भान सोडून योग्य मार्ग मी शोधणे
खरच, हे शोधणे संपायला नको होते....

उशीर झाल्यामुळे तुझे आईला खोटे बोलणे 
खोटे बोल्ल्यानातर पश्चातापाचे होणे
तुझ्या या भोळ्या व्यवहाराहवर मन माझे येणे
खरच, हे मनचे येणे संपायला नको होते....

मनातील सर्व आवेदन मी या प्रवासात करणे
माझ्या सर्व अवेदानाना तुझे स्वीकृती देणे
स्वीकृतीमुळे मनाचे आनंदाने गदमरून जाणे
खरच, मनाचे हे गदमरणे संपायला नको होते.....

तुला सोडताना मनाचे आतून दुखणे
दुखाताना सुद्धा हसत तुला विदा करणे
तू गेल्यानातारही माझे तेथेच थांबणे
खरच, तुझे जाणे मनाला नको होते...

घरी आल्यानातरही तुझ्यातच मनाचे राहणे
माझ्या विचारात फक्त तुझीच काळजीचे होणे
वारंवार फोन कडे जाणा-या हाताना मी  थांबविणे
खरच, मी ह्या हातांचे थांबविणे नको होते....

पूर्ण झाल्यानातरही सर्व स्वप्न सारखे भासणे
या स्वप्न-गंधाचा गंध आता पर्यंत असणे
अशा स्वप्नाची मनने परत वाट  बघणे
खरच, हे वाट बघणे संपायला नको होते...

खरच, हे रस्ते संपायला नको होते
खरच, हे प्रवास संपायला नको होते


@ Poonam chand Varma  :)
@ Poonamchand V