प्रेमाची लढाई

Started by Mangesh5, January 11, 2016, 08:49:18 PM

Previous topic - Next topic

Mangesh5

प्रेमाच्या या लढाईत स्वत्व गमाऊन बसलो,
काटेरी कुंपणाचा दाह कधीच नाही जाणवला,
तुझ्या जाण्याने मात्र वसंत ऋतू रक्तबंबाळ झाला,
त्या जाणिवेने पुन्हा कधीच नाही हसलो,
प्रेमाच्या या लढाईत स्वत्व गमाऊन बसलो।

अस्तित्वाचे अणु शोधताना विसत्वाचे रेणूच वाट्याला आले,
तुझ्या दुराव्याच्या जाणिवेने डोळे ओले झाले,
अपयशाच्या या गर्तेत पुरता मी खचलो,
प्रेमाच्या या लढाईत स्वत्व गमाऊन बसलो।

कित्येक दिवस या प्रेमविराची आठवण कुणाला नाही झाली,
त्याची प्रेमकहाणी मात्र अजरामर झाली,
मृगजळामागे धावता धावता स्वतःच मृगजळ होऊन बसलो,
प्रेमाच्या या लढाईत स्वत्व गमाऊन बसलो।

गहिवरून जाते हृदय,हळवे होते मन,
एकेका तापसारखा भासू लागतो प्रत्येक क्षण,
या अपयशी जीवनाच्या अखेरच्या क्षणी मात्र स्वतः वरच हसलो,
प्रेमाच्या या लढाईत स्वत्व गमाऊन बसलो।

                                               - मंगेश५