मी अनुभवलेला नटसम्राट

Started by Mayur Dhobale, January 11, 2016, 09:58:03 PM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

इच्छाहीन जगणे जगत,
आगतीकतेची शाल पांघरूण ,
जेमतेम शिल्लक स्वाभिमानाची काठी,
अंगातील उर्वरीत ञाण पणाला लावून,
टक टक टक टक अगदी अशीच,
उरलेल्या तुटपुंज्या आयुष्याच्या छाताडावर आदळत.....
थेटर्सच्या exit मधून बाहेर पडली ती दोन बिचारी...
एक होता म्हातारा अन्
सोबत त्याची वाकलेली म्हातारी .....

नुकत्याच अनुभवलेल्या 'नटसम्राटानं',
दोघेही काही काळ नुसते निशब्द...
अचानक पुढ्यात सर्प दिसावा,
तसाच म्हातारा जागीच झाला स्तब्ध ...
पुरे !!! आता बस्स..बस्स झाल 'टपळे'....म्हणत म्हातारा व्याकुळला तो असा-
  "  टपळे,मी म्हणतो व्यर्थहीन आयुष्याचा शेवट तरी व्यर्थहीन नको व्हावा...
किमान उरलेल्या क्षणांना कुरवाळत ,
जगण्यासाठी वेळ द्यावा ....
'अरे, या आयुष्यात नेमकं काय केलं ???'
या विधात्याच्या 'मुख्य' प्रश्नाचे उत्तर देताना,
मागे वळुन पहावं तर,
फक्त पोटाची भागवली ती 'भुक'.....
अन् भाबड्या खोट्या प्रेमापायी,
पोट्ट्यांना वाढून केली ती 'चुक'.....
'बस्स एवढ्यातच जिवनाची पाने कशी काय पलटली?'
या आणखीन एका उद्भवलेल्या 'उपप्रश्नाचा' बोझा खरच पेलवत नाही गं आता..."
   
अस्स म्हणताच, म्हाताऱ्याच्या जवळपास मिटलेल्या डोळ्यांतून ,
अश्रू मुकाटपणे आपली वाट धरु लागली...
पदराने डोळे पुसत म्हाताऱ्याचे...
म्हातारीही ढसढसा रडू लागली ...अन बोलू लागली -
     "   असं कसं म्हणता सम्राट की काहीच नाही केलं....
एवढंच की त्या
मुरदयांपायी,
सार काही गेलं ......
पण मी म्हणते,
विस्कटलेल्या स्वप्नांचा अन अंगाशी आलेल्या उकीरड्याचा लळा आतातरी सोडू......
त्या तुमच्या विधात्याच्या पुस्तकाचा शेवट तरी गोड करण्यासाठी ,
आयुष्याशी घट्ट नातं चला  जोडू....
जगायचं म्हणाल तर ,
तुमच्या स्वाभिमानाची पुंजी अजुनही शिल्लक आहे माझ्या उरात...
अन राहायचं म्हणाल तर,
अंथरुण म्हणून आहे की हि 'धरा'....
चला, पांघरूण म्हणून आख्खं आभाळ घेऊ उरी....
पण शप्पथ आहे माझी सम्राट ....
आता जायचं नाही पून्हा त्या गळक्या घरी ...
त्या गळक्या घरी ...."

एकमेकांचा हात चाचपडत,
वाकलेली आकृती आता जराशी ताठली.....
वाट बदलून दोघेही मला,
दुरून तरूण झाल्यागत वाटली..
दुरून तरूण झाल्यागत वाटली....

( * 'टपळे' म्हणजे म्हाताऱ्याची 'सरकारच')   
               
                -  मयुर ढोबळे ( fb page mazi kavita)

निखिल जाधव


akale44

अभिजित रोहिदास काळे