साविञीबाई फुले - ज्योत अजुनही जळत आहे

Started by Mayur Dhobale, January 11, 2016, 10:46:50 PM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

प्रचंड काळाकुट्ट काळोख ...
अन अज्ञानाने भरकटलेली डोके...
मुलगी अन् शिक्षण ,
समुद्राची दोन टोके...
अहो चक्क बालवयातच लग्न...
अन उर्वरीत आयुष्य ,
अन्याय सहन करण्यातच मग्न ...
नवरा गेल्यावर कधी सती...तर कधी केशवपन....
निरर्थक जगणं कुढत,
टिकेच्या बोझ्याखाली चेंबून आपल नाजुक मन,
'स्री' रुपी प्राणी जगत होता...
उच्च सनातन्यांविरुध्द उभा                राहण्यास ,
कुणी मर्दही धजत नव्हता ....
अशात 3 जानेवारी 1831 साली...
स्वता आई भवानीच ज्योत बनुन,
लक्ष्मीबाईच्या उदरी जन्मास आली...
अन्यायाला चिरण्यासाठी मग,
धरली शिक्षणाची कास...
दगड धोंडे अंगावर झेलत,
मनी पोरींना शिकवायची आस...
ज्ञानरुपी मशाल पेटवुन,
ती ज्योत अजुनही जळत होती....
'भिडे वाडा' पुण्यामध्ये,
झाली पहिली शाळा सुरु...
नऊ सवसनी घेऊन सोबत,
1848 साली, देवीच त्यांची पहिली वहिली गुरु....
शेण,घाण, दगड, विष्ठा,
अजुनही बाई झेलायची...
शिव्या मुर्खांच्या खात ,
माय माझी एक साडी,
खुशाल पिशवित घेऊन चालायची....
हळुहळु का होईना ,
अज्ञानरुपी काळोख..
ज्योतीच्या प्रकाशात पुसट झाला....
मरगळलेल्या कळ्यांना फुलवत,
शिक्षणरुपी बगीचा उदयास आला...
तरी अजुनही ज्योत जळतच होती....
कधी नाभिक समाज प्रबोधन...
तर कधी काव्यातुन संमोहन...
कधी बालहत्या प्रतीबंध कार्य...
तर कधी 'सत्यशोधक' अपरीहार्य...
पोटासाठी शरीर विकणारया,
बाया बापट्यांना,
नव्या उमेदीन जगायला शिकवत...
ज्योत अजुनही जळत होती...
सन 1897 प्लेगची साथ पसरली....
कित्येक जीव आयुष्याच्या घसरगुंडीवरुन,
कायमचीच घसरली...
संसर्गजन्य रोग म्हणून चक्क ब्रिटिशांनी ,
स्थलांतराचा आखला बेत....
जरी पाण्यागत वाहत होती निर्दोष प्रेत....
आटा-पिटा करत जीवाचा,
शेवटी माईनेच सुरू केली सेवा....
क्षणभर विचार नाही स्वतः चा...
ना स्वशरीराचा हेवा...
शेवटी व्हायचं नव्हत तेच झालं ....
लागन प्लेगची माईला झाली ....
माय माझी सोडुन जगाला,
10 मार्च 1897 ला गेली...
.
.
.
तरीपण ज्योत अजुनही जळत आहे....
जळत आहे लाखो मुलींच्या हृदयात ,
ज्या शिक्षणाची कास धरुन ध्येयपुर्तीची वाटचाल करत आहे....

                          ..................मयुर ढोबळे