आठवणीत तुझ्या

Started by akale44, January 12, 2016, 04:34:03 PM

Previous topic - Next topic

akale44

आठवणीत तुझ्या जीव झाला वेडापिसा
जणू पाण्याविन कासावीस मासा

तुझ्या आठवणीत उचंबळले मन माझे
येतसे डोळ्यांसमोर बावरे निजरूप तुझे

होता आठवण तुझ्या मोहक स्पर्शाची
चिंताग्रस्त मनी लहर उमटतसे हर्षाची

पाहुनी चित्र तव Mobile मध्ये माझ्या
एक एक क्षण कंठीतोय राजा तुझा

तुझ्या आठवणीत जीव होतसे व्याकूळ
होऊनी मन बधिर, हृदयाला पडतसे पीळ

चित्र नित्याचेच होतसे अपरिचित
जाता मजपासून दूर माझी प्रीत

कधी नव्हे तो फुटला पाझर कातळाला
वाटे घेउनि समशेर चिरावे ह्या काळाला

हूर हूर ही मनाची संपेल आता तेव्हा
पाहील तव मूर्ती डोळ्यांसमोर जेव्हा

जड झाली नेत्रे करुनी तव प्रतीक्षा
मिठीत मम येउनि द्यावीस मज दीक्षा

कुठवर थांबवू आता हा भावनावेग
काळजाच्या भिंती फोडुनी गर्जती मेघ

ओढ लागलिया तुझी माझ्या प्रियतम अनु
पावसाची वाट पाहणारा एक चातक जणू
अभिजित रोहिदास काळे