पुन्हा येतोस का रे भेटायला???

Started by swara, January 12, 2016, 04:47:11 PM

Previous topic - Next topic

swara

पुन्हा येतोस
का रे भेटायला
दुरूनच खूप वेळ
पाहत राहायला   

डोळ्यात काही
काळ रमायला
माझे अजून थोडेसे
लाड करायला

पुन्हा येतोस
का रे भेटायला
मिठीत माझ्या
विरून जायला

तासाभरासाठी
नुसतच बोलायला
माझ्यावर थोड
अजून प्रेम करायला