तोचि भगवंत

Started by akale44, January 12, 2016, 04:53:11 PM

Previous topic - Next topic

akale44

जया मनी सद्भाव, मुखी विठ्ठलाचे नाव |
त्यागलीया सारी हाव, तोचि भगवंत ||

अपार गाळुनीया घर्म, करुनिया दानधर्म | 
जाणियले जीवन मर्म, तोचि भगवंत ||

वळण जयासि जडिले, मदत करण्या अडीले |
जयाने भूतपाष तोडिले, तोचि भगवंत ||

आकलुनी परमनीति, आचरसि तद्रूप कृती |
तिन्ही लोकी जयाची ख्याती, तोचि भगवंत ||

पुरस्कारुनी मानवजात, टाकुनी विषमतेची कात |
लाविली बंधुभावनेची वात, तोचि भगवंत ||

चराचरांत मानुनी देव, जपली सृष्टीची ही ठेव |
निसर्ग पांडुरंगचि एव, तोचि भगवंत ||

ना सुखाची आवड, ना दु:खाने होतसे परवड |
घेतली विश्वाची कावड, तोचि भगवंत ||

कर्माची करुनीया भक्ती, ठेउनी तयाशी आसक्ती |
स्वीकारिली कीर्तीपासुनी विरक्ती, तोचि भगवंत ||

देवूनी मायेची साउलि, रक्षसि जसे माउली |
जयाने प्रकाशवाट दावली, तोचि भगवंत ||

नाही उपेक्षांची खंत, नाही अपेक्षांची भ्रांत |
रूपे जयाची अनंत, तोचि भगवंत ||
अभिजित रोहिदास काळे