स्वप्नपरी....

Started by Prasad.Patil01, January 12, 2016, 07:28:09 PM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01


आयुष्यात आता एक अशी पहाट यावी,
स्वप्नांमधली ती माझ्या वास्तवात यावी.

जशी स्वप्न अप्सरा माझ्यासाठी उतरावी,
इच्छा ही माझी आता सत्यात यावी.

अंथरुणात साखरझोपेत पडलो असता मी,
हवी मला उभी तेव्हा माझ्याशेजीच ती.

हलक्या स्वरात उठवायचा प्रयत्न तिने करावा,
मी पण तिच्या स्वप्नातच रमलेला असावा.

मग तिने ओले केस हळूच मला स्पर्शावे,
स्पर्शाने त्या अंग माझे सारे थरथरावे.

खुलता नयने मला तिचा सुंदर चेहरा दिसावा,
घड्याळीचा काटा आता जागीच रुतून बसावा.

मी पण थोडं खट्याळ होऊन जवळ तिला खेचावे,
तिनेही मला तिला सारे स्वाधीन माझ्या करावे.

आता मला दूर सारून सुंदर अशी लाजवी,
जणू लाजेच्या पावसात ती चिंब चिंब भिजवी.

मग मी पुन्हा जवळ घेऊन खूप प्रेम करावे,
प्रेमापुढे जग तिचे सारे फिके पडावे.

तिची माझी पहाट ती आठवणीत राहावी,
जायची यायची वेळ तिची घड्याळीतच नसावी.

आता मात्र बंद घड्याळ पुन्हा सुरु व्हावं,
वर्दळीच जग माझं पुन्हा चालू व्हावं.

पुन्हा स्वप्नात यायला ती आता निघून जावी,
उठवायला रोज मला ती स्वप्नपरी यावी.

                                          - प्रसाद पाटील
                                            (स्वलिखित)