तुला यायचं असेल तर...

Started by श्री. प्रकाश साळवी, January 13, 2016, 05:56:34 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

तुला यायचं असेल तर...

तुला यायचं असेल तर...
खुशाल ये, मोगरा ऊधळीत
आपल्या खळीत हसणा-या गालात
ये नाती अशी जुळवित

तुला यायचं असेल तर...
खुशाल ये, नक्षत्र-तारे ऊधळीत
आपल्या गोड गुलाबी हसण्याने
ये सकलांची मने खुलवित

तुला यायचं असेल तर...
खुशाल ये, चांदण्यांची बरसात करीत
तुझ्या काळयाशार नयनांनी
ये सा-यांची मने भुलवित

तुला यायचं असेल तर...
खुशाल ये, नभातील रंग ऊधळीत
तुझ्या गोड गुलाबी ओठातुन
ये जगाचे हास्य फुलवित

श्री.प्रकाश साळवी.

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]