आयुष्याचे बोल

Started by Minakshi Pawar, January 15, 2016, 06:46:35 PM

Previous topic - Next topic

Minakshi Pawar

जगात नाही कोणी सर्वसुखी
दुःखाचा घास सर्वांच्या मुखी,

कमी जास्त दुःखाच्या वाटा
थोड्या थोडक्या सुखाच्या लाटा,

आयुष्य आहे पाण्यावरची नाव
वागताना सर्वांशी भान ठेवा राव,

आयुष्यभर नाव अशी तरंगली
एकदा तरी ती पाण्यात बुडाली,

माझे तुमचे सर्वांचेच आयुष्य
लपले त्यात आपले भविष्य,

विचार तुम्ही जरा करून पहा
जगाच्या कल्याणा देह आपला वाहा,

कल्याण होईल तुमच्या जीवनाचे
सार्थकी लागेल आयुष्य सर्वांचे.

                सौ. मीना मोहनराव पवार .