मला वाटते... एकतेतुन उत्कृष्टता

Started by शिवाजी सांगळे, January 15, 2016, 08:21:09 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मला वाटते...

एकतेतुन उत्कृष्टता

सहज विचार करता करता अस लक्षात आलं कि "आपण स्वतःहुन कुठे जुडल्याने तर काही ठीकाणी परस्पर जोडले गेल्याने एक दोन नव्हे तर तब्बल तेरा साहित्तिक व अन्य दोन ग्रुपवर कार्यरत आहोत या व्यतिरीक्त स्वतःचे अकाउंट व एक वेगळे पेज आहेच. वाँट्स अँप व त्याचे ग्रुप वेगळेच.

एवढया सा-या ग्रुप्सचा लेखाजोखा पाहता, ठेवता असे लक्षात आले कि ८० ते ९० टक्के तेच मेंबर्स ईतर ग्रुप्सवर जोडलेले आहेत, मग त्यात वेगळेपण कोणते? प्रत्येकाची एकच पोस्ट सर्व ग्रुप्सवर फाँरर्वड केली जाते, व त्याची खुप वेळेस पुनरावृत्ती होउन तोचतोपणा जाणवत राहतो, खैर सर्वांनी माझ्या हया मताशी सहमत असायला हवे असा माझा  हेतू किंवा आग्रह मुळीच नाही.

जेव्हा एखादी चांगली, दाद देण्याजोगी  पोस्ट प्रथम एका ग्रुपवर पाहतो/वाचतो, तेव्हा तीला आपण उस्फुर्तपणे लाईक अथवा कमेंट देतोच, कधी कधी त्याच पोस्टला दुस-या ग्रुपवर पण अशीच कमेंट प्रत्येका कडून दिली जाते, मग तीस-या, चौथ्या वगैरे करे पर्यंत मात्र सुरवातीचा उस्फुर्तपणा हरवत जातो एवढं नक्की.

मला वाटतं, अशी स्थिती माझ्या ब-याच मित्रांची सुद्धा होत असावी, नोकरी, व्यवसाय करून सर्वजण हा सारा साहित्तिक प्रपंच सांभाळीत असतील! खरचं या सा-याला न्याय देतो का आपण? तर मला वाटतं, नाही देत, कारण दोन पेक्षा अधिक ग्रुपवर लक्ष ठेवुन हल्लीच्या धावपळीत कार्यरत राहणं तसं अवघडच नाही का? याला मी पण अपवाद नाही. आपल्यापैकी ज्या काही मित्रांना ब-याच ग्रुपवर कार्यरत रहायला वेळ अाहे त्यांना भाग्यवानच म्हटले पाहीजे.

एक विचार असा आला कि, जर एवढया सा-या ग्रुप्सचे एकत्रीकरण करून एकच ग्रुप तयार केला तर काय धमाल येईल? जसं "एक मंच अनेकोत्तम मित्रांच्या विचारांचा संच" अशा प्रकारचा ग्रुप झाला तर पुनरावृत्ती न होता साहित्याचा आस्वाद घेता येईल, पसेच अपरीचित असलेल्यां ग्रुपमधील मेंबर्सचा सर्वांंशी परीचय होईल, महत्वाचं म्हणजे एकच पोस्ट सतत वेगवेगळ्या ग्रुपवर टाकण्या पासुन ते ईतरांनी ती वारंवार वाचण्या पासुन सुटका मिळेल.

मला वाटते, ही पोस्ट वाचणा-या सर्व समुह संचालकांनी परस्परांशी या विषयी समजुतदारपणे व मोकळेपणाने चर्चा करून एकत्रिकरणाचा विचार जरूर करावा व एकतेतुन उत्कृष्टतेचा प्रयत्न करावा असे मला वाटते.

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९