तीच जुनी उर्मटता

Started by विक्रांत, January 15, 2016, 11:04:40 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

तीच जुनी उर्मटता
हक्काआड दडलेली
इवलीशी खेचाखेच
आकाशाला भिडलेली

काही झाले तरी इथे
मी मी तू तू ठरलेली
सराईत तलवार
मर्मस्थळी घुसलेली

कुणा काय मिळे इथे
कुणी काय घालवले
तळ्यातल्या माश्यातच
पाण्यासाठी युद्ध चाले

जिंकणारा हरणार
उपरा लोणी खाणार
हे तो ठरलेले सारे 
तरी खेळ चालणार

चल गड्या सोड आता
सराई ही सडलेली
नदीकाठी तरुतळी 
दुनिया ती भारलेली

देव माझा दिगंबर
राहवया घर नाही
टीचभर जागा तरी 
अहंला आधार नाही

विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in/