पडणारे पावसा

Started by Dnyaneshwar Musale, January 16, 2016, 12:03:15 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

काळ्या मातीला  पडली रे भेग
कशी भुजवायची ही रेग
न्याहारीलाच पडतं र ऊन
उपाशीच पाण्याला वन वन जाते सुन

गवताची पाती मातीत निजली
जनावरांची तहान हंबरड्याने विझली
दुष्काळाची हि कोरडीच हवा
निपचिप पडला पाखरांचा थवा

एक एक रान झालंय उजाड
फुकटच खाण्यास आहे रे लबाड
काळया ढगांना का न कळे माझं ओझं
सावकरचं फेडायचं  अजुन बोझ

उफणुनी  निघतात
नुसत्याच बणग्या ,
कशा भरणार
शेतकर्याच्या पोटाच्या कणग्या ,
दुष्काळाने  खाल समद यंदा
पोटाला मारावा जणु काय  रंधा         


काही बसलेत तुपाशी
कुणी झोपतंय उपाशी
वाटपहातोय तुझी रे असा
आता पडणारे पावसा.