दे धक्का...! शिकवणी?

Started by शिवाजी सांगळे, January 17, 2016, 01:27:46 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

शिकवणी?

राजकारण्यांनी त्यांच्या पद्धतीने
आज साहित्त्यावर गप्पा मारल्या,
साहित्तिकानी सुद्धा मोकळेपणाने
राजकारणातल्या चाली रचल्या!

काहिजण नियोजित वेळेपेक्षा
संमेलनस्थळी उशिरानेच आले,
मुख्यमंत्री तर, अध्यक्षीय भाषण
सुरू होण्यापूर्वीच निघुन गेले !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९