शेतकरी

Started by Minakshi Pawar, January 19, 2016, 12:35:14 PM

Previous topic - Next topic

Minakshi Pawar

                           शेतकरी

शेतकरी दादा तु शेतकरी दादा
असा कसा रे तुझा हा धंदा,

       सर्वांनसाठी तु करतो काबाडकष्ट
      सांग तुझ्या मनातील कोणती गुपीतगोष्ट,

हरितक्रांती घडविली तु ह्या देशात
पण पुरेसे अन्न नाही उरत तुझ्या घरात,

        अशी कशी धरणीमाता रूसली तुझ्यावर
दारिद्रयाचे वारे येईल भारत मातेवर,

तुझ्यावर पाळी आली आत्महत्या करण्याची
शासनाने वाट पाहावी कारे तुझ्या मरणाची?

         तु तर आहेस देशाचा राजा
         देशभर व्हायला हवा तुझा गाजा वाजा,

असे माञ झाले नाही नशीब तुझे खोटे
तुझ्या नशिबी काय नेहमीच असे गोटे,

           काळी माती आहे तुझी आई जशी
           तिचा आशिर्वाद असो तुझ्या पाठिशी,

एक दिवस तुझाहि येईल
नशिब नक्कीच साथ तुझा देईल..........

             सौ. मीनाक्षी मोहनराव पवार
                       9552659011