मन डोह

Started by शिवाजी सांगळे, January 19, 2016, 05:54:38 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मन डोह

अथांग डोह मन,
अनेकविध भावनांचा
उंच, बारीक, कधी जाड
सावल्यांचा...
 
घेऊन भोवती पारंब्यां
रूतलेल्या, गर्द वड
डोकावुन पाहणारा
प्रतिबिंबांचा...

गुढ अज्ञात हुंकार
स्वरात रमुन कधी
आतल्यात शोषणा-या
चिंतनाचा...

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९