सहवास

Started by गणेश म. तायडे, January 20, 2016, 09:20:17 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे


आज मला हक्क तुझा हवा
शहारल्या दिशा बहारल्या मना...
सुगंध तुझा दरवळतोय कसा
भ्रमुणीया मना आज गेला असा...
चांदण्यारातीचा काजवा हा नवा
सहवास मला आज तुझा हवा...
पांघरूण घेईल केसांना तुझ्या
उडवील झोप डोळ्यातील तुझ्या...
लाजेने तुझ्या झुकतीया नजरा
लपला चंद्र पापण्यांत जसा...
श्वासात माझ्या श्वास तुझा
जिवात जिव दडलाय जसा...
आज मला हक्क तुझा हवा
शहारल्या दिशा बहारल्या मना...

- गणेश म. तायडे
   खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com