तिच्या डोळ्यात हरवलाय माझ्या स्वप्नातला भारत..

Started by Vinod Thorat, January 20, 2016, 03:56:13 PM

Previous topic - Next topic

Vinod Thorat


तिच्या डोळ्यात हरवलाय माझ्या स्वप्नातला भारत..


सिग्नलवर एक चिमुरडी होती तिरंगा विकत
येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे आशेने बघत
कधीच हरवलीये तिच्या डोळ्यातील निरागसता
उरलीये फक्त पोटातली भूक आणि असह्यता
घर, शाळा गोष्टी तिच्यासाठी फारच लहान
तिच्यासाठी रोजच जगणंच एक आव्हान
देश, स्वातंत्र्य, प्रजासत्ताक काहीच नाही तिला कळत
तिच्या डोळ्यात हरवलाय माझ्या स्वप्नातला भारत !!!


काही लोक झेंडे विकत घेतील
दिवसभर शर्टवर मिरवतील
भारतमाता कि जय म्हणत राष्ट्रभक्ती दाखवतील
अन उद्या तेच झेंडे अडगळीत टाकून देतील
ती मात्र असेल दहा रुपये मिळाल्याच्या आनंदात
आज काहीतरी चांगल खाता येईल या विचारात
उद्या मात्र तिथेच असेल परत, दुसर काहीतरी विकत
तिच्या डोळ्यात हरवलाय माझ्या स्वप्नातला भारत !!!


तीही कधी शाळेत जाईल का?
शिकून खूप मोठी होईल का?
स्टार्टअप इंडिया मध्ये तिच्यासाठीही एक स्टार्टअप असेल का?
स्मार्ट सिटी मध्ये तीही स्मार्ट बनेल का?
तिलाही कधी अच्छे दिन येतील का?
तिच्या स्वप्नांची गलबत कधीतरी किनाऱ्याला लागतील का?
कि तीही राहील आयुष्यभर आपल्या नशिबाला कोसत
तिच्या डोळ्यात हरवलाय माझ्या स्वप्नातला भारत !!!


माझा भारत शोधण्यासाठी
तिच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत नाही माझ्यात
कारण परिस्थितीचा दाह अंगार फेकतोय तिच्या नजरेतून
विचारतोय प्रश्न मला, काय चुकल माझं ?
जन्माला आले हे चुकलं ?
कि या देशात जन्माला आले हे चुकलं ?
केवळ सहानभूती नकोय तिला, हवी सर्व समाजाची सोबत
तिच्या डोळ्यात हरवलाय माझ्या स्वप्नातला भारत !!!


Vinod Thorat

Thank you all for appreciating my poem..If you really like it kindly share it on FB/Whatsapp so that it can reach to maximum people...Tichyasathi evadh tar karuch shakata tumhi [/font][/size]smile emoticon[/font][/size][/font][/size]