काय सांगू कसे सांगू काय घडले त्या रात्री ,

Started by rushi@rugvedi, January 20, 2016, 08:38:35 PM

Previous topic - Next topic

rushi@rugvedi

काय सांगू कसे सांगू काय  घडले त्या रात्री ,
भावनाशी खेळून गेला तों त्या रात्री,
माझाही संयम सुटला त्या रात्री,
काय सांगू कसे सांगू काय  घडले त्या रात्री.

हळूच त्यानं हात हाती घेतला,
मी पण थोडशी लाजले,
डोळ्यावरची केसांची बट सारवित,
गालातल्या गालात हळूच हसले,
काय सांगू कसे सांगू काय  घडले त्या रात्री

बाहूत घेतल त्याने मग मला,
अंग अंग माझे शहारून आले,
नजरेला नजर भिडताच त्याची,
काळजात कसे धस्स झाले,
काय सांगू कसे सांगू काय  घडले त्या रात्री

माळला मग अबोलीचा गजरा डोक्यात  त्याने
गुलाबाचे फुल ओठावरून फिरवले,
होताच स्पर्श त्याचा ,
सारे देहभानच हरवले,
काय सांगू कसे सांगू काय  घडले त्या रात्री,

झोपच येईना मग चलबिचल,
चालली होती त्या मनाची
कितीतरी दिवस मी ,
वाट बघत होते ह्या क्षणाची,
काय सांगू कसे सांगू काय  घडले त्या रात्री,


ऋषिकेश सोनवणे

९९२३२०००८०



Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]