बात नशेची

Started by शिवाजी सांगळे, January 20, 2016, 11:19:36 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बात नशेची

एका सारखी एकच असते
कैफियत सर्व पिणाऱ्यांची,
बाटली बाटलीत चव वेगळी
शेवटास उरे बात नशेची !

दुख:ची नशा असे कुणा
तर कुणा नशा पैशाची,
ईश्काची तर नशा आगळी
कुणास असे प्रेमभंगाची !

सौदर्याची नशा कुणाला
कुणास असते साजाची,
ठेऊन उघडी लाज सारी
नसे चिंता काहीनां देहाची !

कर्मकांडात नशा निर्बुध्दाला
बुध्दीजीवास नशा ज्ञानाची,
सेवेसाठी तडफडतो कोणी
लबाडां नशा अपुरी सत्तेची !

©शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९