कळले मला न तेंव्हा!!!

Started by श्री. प्रकाश साळवी, January 22, 2016, 12:21:43 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

कळले मला न तेंव्हा!!!
कळले मला न तेंव्हा, तव माझाच ध्यास आहे
प्रितीस तुझ्या त्या, मज विश्वास आहे
आजही भासतो का, चंद्र हा ऊदास ऊदास
स्मितहास्य पाहण्याचा, हा माझा प्रयास आहे
असता समीप तू, मज काही न का सुचावे
रातरणीचा सुगंध तव स्पर्शास आहे
शोधतो तुला मी स्वप्नात वा जागेपणीही
वाटते मला की तू आसपास आहे

प्रकाश साळवी

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]