शब्दसूर !!!

Started by श्री. प्रकाश साळवी, January 22, 2016, 12:38:19 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

शब्दसूर
शब्दसूर झाले सारेच अमृताचे
तु गाशिल का रे ते गित चांदण्याचे

हळूवार पुसे मग चंद्र या धरेला
तु पाहिलेस काय माझिया प्रियेला
मी पाहिले स्वप्न माझिया प्रियेचे
तु गाशील का रे .....

कधी शब्द सूर झाले सूरात शब्द कधी
आळविला प्रेमराग ऊमगले ना कधी
वचन पुर्ण झाले शब्दात बांधण्याचे
तु गाशील का रे .....

पाहिले तुला मी सूरात सूर होता
पाहिले तुला मी शब्दात शब्द होता
पाहिले तुला मी गित गाता प्रितीचे
तु गाशील का रे .....

श्री. प्रकाश साळवी


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]