==* कुठं संडासं संडासं *==

Started by SHASHIKANT SHANDILE, January 22, 2016, 03:06:00 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

नमस्कार मित्रांनो,

दि. १८/०१/२०१६ ला मी पुणेहून नागपूर करिता बसद्वारे प्रवास सुरु केला. पहाटे ५ वाजताच्या दरम्यान माझी झोप उघडली आणि मी बस चालकाच्या बाजूला येऊन बसलो.
सकाळचा थंड वारा आणि हलकेच उजाडता दिवस, सूर्याचा प्रकाश हळू हळू धरणीला प्रकाशित करत होता.
इतक्या सकाळी सकाळी बसचा प्रवास म्हंटलं तर खूप छान वाटत होतं. बस समोर चालत राहली आणि वाटेत येणारे चित्र मी बघत होतो आणि असेच एक चित्र माझ्या नजरे समोर आले ज्यामुळे वाटलं कि, काय खरच आपला भारत देश विकास करतोय?

ते चित्र म्हणजे, रस्त्याच्या कळेला उघड्यावर बसलेल्या बाया

एकीकडे सरकार द्वारे हागणदारी मुक्त गावं म्हणून कोट्यवधी रुपये खर्च केल्या जाते, देश विकासाची गोष्ट करीत आहे आणि दुसरीकडे आपल्या आया - बहिणींना आजही उघड्यावर जावं लागतंय. मग यालाच विकास म्हणायचं का?
ते चित्र बघितले आणि अचानक माझ्या मनात बहिणाबाई चौधरी यांची "अरे संसार संसार" या कवितेच्या चालीवर २ ओळी सुचल्या त्या खालीलप्रमाणे.

"कुठं संडासं संडासं हागणदारी मुक्त गावं
हागे रस्त्यावरं बाई हाचं देशाचा विकासं //२//"

मी लिहिलेले शब्द तुम्हाला जरी वाईट वाटत असले तरी ते या विकासनशील भारत देशाचे कटू सत्य आहे. सदर शब्दावर वाईट वाटण्यापेक्षा जर कुणाला लाज वाटत असेल तर मला आनंद होईल.
सर्वांना माहित आहे कि, वास्तव स्थिती काय आहे पण तरीही सर्वीकडे डोळेझाक चालली आहे. जरा काही झालं कि, आपण फक्त सरकारच्या नावाने दगड फोडतो पण आपण या देशाकरिता काय करतोय याचा विचार कुणीच करीत नाही. आपल्याला फक्त एकच गोष्ट चांगल्याने जमते आणि ते आहे गोष्टी, आपण फक्त गोष्टी करतो, पण कर्म नाही. मला काय , माझं काय, मी करणार काय, बस इतकंच.  चहाची टपरी असो वा चौक असो आपण फक्त गोष्टी करतो. गोष्टी विकासाच्या, आधुनिकीकरनाच्या  आणि जगाला मागे सोडण्याच्या पण मी त्या दिवशी जे बघितलं ते आधुनिक नव्हतंच, ते चित्र म्हणजे मला माझ्या भारत देशाची औकात दाखवीत होती. सरकार काय करतीय, श्रीमंत काय करतीय मला त्याच्याशी घेणे देणे नाही, मला फक्त तुम्हाला विचारायचं आहे कि, तुम्ही काय करताय?

सरकारची चूक असेलही, पण सरकारने जर स्वच्छता अभियान सारखे धोरण हाती घेतले तर आपण त्याला किती सहकार्य करतो, हा विचार करायला नको का ?

असो, सर्वांना सर्व काही माहित असूनही आपण फक्त देशासाठी समर्पित असल्याबद्दलचा देखावा करीत असतो, त्याव्यतिरिक्त आपण काहीही करू शकत नाही. आणि आज मी बिनधास्तपणे म्हणू शकतो कि , भारत देशाचे सुधारणे आणि या देशाचे पूर्ण विकास होणे अशक्य आहे.

(बहिणाबाई चौधरी यांची "अरे संसार संसार" या कवितेच्या चालीवर २ ओळी सुचल्या आणि त्यावरूनच मी खालीलप्रमाणे रचना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.)

कुठं संडासं संडासं हागणदारी मुक्त गावं
हागे रस्त्यावरं बाई हाचं देशाचा विकासं //२//

कुठं संडासं संडासं बघा माह्या भारत देशं
कुठं संडासं संडासं बघा माह्या भारत देशं
घरी दिसे ना संडासं हा कसला विकासं

कुठं संडासं संडासं --------------------

कुठं संडासं संडासं कसं लाजते सासरं
कुठं संडासं संडासं कसं लाजते सासरं
किती वर्ष झाले तरी आपले तेचं विचारं

कुठं संडासं संडासं --------------------

कुठं संडासं संडासं माणूस गेला चंद्रावरं
कुठं संडासं संडासं माणूस गेला चंद्रावरं
दिसे रसते गावाचे गडव्यानेचं सजूनं

कुठं संडासं संडासं हागणदारी मुक्त गावं
हागे रस्त्यारं बाई हाच देशाचा विकासं

टिप :- कुणाच्या भावना दुखावल्यास अगोदर स्वतः विचार करावे.

धन्यवाद!

शशिकांत शांडिले , नागपूर
भ्रमणध्वनी - ९९७५९९५४५०
दि. २२/०१/२०१६
===================*****=======================
Its Just My Word's

शब्द माझे!