पतंग - जी जिंकूनही हारली

Started by Mayur Dhobale, January 23, 2016, 07:58:50 PM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

या स्पर्धेच्या युगात सगळेच बघा कसे  एकदुसरयाला मागे टाकून पुढे जाण्यासाठी नुसते वेड्यागत धावत सुटलेय,
पण गंमत म्हणजे नेमकं कुठं पोहचायचं कुणालाच ठाऊक नाही !!!
या 'स्पर्धेनेच' खरतर आपल्या स्वप्नांच वाटूळ केलय...
तिच्यापासून थोड सावध करणारी माझी - 'पतंग'...

            * पतंग *

हृदयी सुटलेल्या मोहापरी...
उडवू लागलो, 'स्वप्न' नावाची 'पतंग'...
'आयुष्य' नावाच्या आभाळात...
स्वप्नवेडा मी,
चैतन्यानं अगदी भारावलेलो...
प्रयत्नाने अन् थोड्या कौशल्यानेही सजलेलो...
'सजक्या' माझ्या पतंगीला ,
हळुवारपणे उंच उंच उडवू लागलो,
आकाशाच्या दिशेनं तीने घेतलेल्या प्रत्येक झेपीसोबत,
खरतर माझं मलाच घडवू लागलो ....
एकाच दिशेची कास धरत ,
हवेच्या विरोधी दाबाला चिरत...
माझी पतंग आकाशात तग धरु लागली ...
झोका उंच उंच घेताना ,
तिला वारयाचीही साथ लाभली...
अन् काय सांगू दोस्तहो,
अगदी प्रयत्नार्थी परमेश्वर !!!!
अखेर स्वप्नाला पूर्णविराम मिळालाच...
हातातला मांजा रिकामा होण्याचा सांगतो आंनद निराळाच....
ध्येयप्राप्तीच समाधान,
कदाचित तिच्या मनरुपी शेपटीलाही झालं ...
फडफड- तडफड तिची आता मात्र स्थिरावली,
पाहून चक्क माझ्या डोळ्यांत पाणी आलं ...
ध्येयावर डोळा लावून असलेली पतंग ,
आता मस्त रिल्याक्स झाली...
आजुबाजुला न्याहाळायची संधी,
बघा ना किती लवकर चालुन आली...
मग बघताच बाजुला ,
चेहरा हिचा पडला...
सोबत शे-दिडशे सवतींना पाहून ,
तिच्या डोक्यात विपरीत परिणाम घडला....
मग काय, झाली सुरू खरी स्पर्धा -
      'स्पर्धा' जी जिंकण्याची नाही ...
दुसऱ्याला हारवण्याची...
'स्पर्धा' जी एकमेकांना जोडणारी नाही हं,
एकमेकांना एकमेकांपासून तोडणारी....
'स्पर्धा' आनंद मिळवण्याची-मुळीच नाही !!!
दुसऱ्याचा आनंद हिरावण्याची.....
'ध्येयप्राप्ती' म्हणजे 'यश',
ही सरळ साधी व्याख्या ,
पतंगीला आता अर्धवट वाटू लागली ...
"एकट्यान केलेली प्राप्ती ,
म्हणजेच यश"-
गैरसमज करून खुशाल ,
ती परख्यांना काटू लागली ...
अन छाटून पंख सारयांचे,
कालांतराने आकाशात एकटीच उरली...
मग कुठे खरतर,
यशाच समाधान तिला लाभलं.
या यशा सोबत तिने गाठलेल्या 'उंचीनेच' तिला,
दोन छान पुरस्कार ही बहाल केले -
'प्रसिद्धी' आणि 'अहंकार' या नावाचे...
यांच्याच जोरावर सुटलेला 'लोभ' नावाचा मोह तिला काही केल्या आवरेना,
माझ्या 'शांती' नावाच्या धाग्यानेही,
तिच्यातल 'भूत' काही केल्या सावरेना.....
मलाही थेट धिक्कारुन,
शिल्लक 'गुर्मी' नावाचं इंधन संपेस्तोवर,
पतंग तावातावात उंच उडत गेली.
इतकी उंच कि आता मलाही दिसेना...
शंभर टक्का सांगतो,
ती अंतराळात पोहचली....
"सारया ग्रहांना घालीन गवसनी" म्हणत-
बाई तोरयातोरयात तळपत्या 'शुक्रा'लाच धडकली....
शुक्रालाच धडकली....
बिचारी अखेर संपली..कायमचीच!!!


      :- मयुर ढोबळे ( https://www.facebook.com/Mazi-kavita-1505223896380307/)