काय असतं हो नेमक प्रेम ?????

Started by Mayur Dhobale, January 24, 2016, 10:30:01 PM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

*** प्रेम म्हणजे ...***

काय असतं हो नेमक प्रेम ???
कळलं मला तेव्हा ....
ध्यानीमनी नसतांना,
अचानक पाऊस पडला जेव्हा ....
प्रेम म्हणजे नुसतच देणं,
जसा निसर्ग आपल्याला देतो....
बाप कधी पोट्ट्याकडून,
काही स्वार्थी भावनेने घेतो...???

प्रेम म्हणजे तेच हो,
जे झाड आपल्यावर कच्चून करतं....
सावली देत आपल्याला ,
स्वतः मात्र  ऊन्हामध्ये मरतं....

प्रेम  म्हणजे तेच,
जी धरणी माय देते,
आपलीही माय तशीच अगदी ,
आपल्या छकुल्यापायी जिवाचे रान करते....

खरतर प्रेमात नसतं कधी
हे माझं हे तुझं ...
अटी-तटी, शपथा-शुपथा,
नसतं याच कधीच ओझं ...

प्रेम म्हणजे सांगतो ऐका-
" हवेचा थंडगार झोका,
जो क्षणात मरगळ मिटवतो...
चंचल मनाला स्थिरावून,
कटकटींना कटवतो..."
कधी कराल तर अस्सच प्रेम करा,
जिवनात गोडवा ओतत,
मस्त निस्वार्थी जगा....
       
            -  मयुर  ढोबळे  (https://www.facebook.com/Mazi-kavita-1505223896380307/)