तुझे तिच्यात अन तिचे तुझ्यात मन हरवलय..

Started by Poonam chand varma, January 25, 2016, 11:27:41 AM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

आज मनमोहक गंध येत होता..
आठवणीचा तो सुगंध येत होता...

सुगंधात मन मोहले जात होते..
विरहात डोळे सोहळे जात होते...

आवरलं मी या मार्मिक भावनांना
विचारल मी मनाच्या गाभार्याना...

का करतोस रे वेड्या तू तिची ओढ ..
का आठवतोस रे त्या आठवणी गोड...

नेमके काय आहे तुझे विचार तिच्याशी
काय अपेक्षा आहेस तिच्या वागण्याची...

मनाच्या उत्तराने तर हृद्यच भरवलं
म्हणे ! का शोधतोय मला मी तर हरवलय....

मी तर नाहीच आता तुझ्या या देहात ...
जागा मिळाली मला तिच्या हृद्यायात....

मी तर घाबरलो एकून उत्तर मनाचे....   
जगू कसा हृदयाविना आता हेच प्रश्न विचारांचे....

यावर मनानेच मला मोठ्या प्रेमाने समजवलय... 
जसे तुझे तिच्यात तसे तिचे तुझ्यात हरवलय..

आता कशाची भीती आणि का होईल विपक्षा
विचार तिच्याच मनाला तिच्या सर्व अपेक्षा...

स्पर्श केले माझ्यात धडकणा-या तिच्या या मनाला ...
विचारल्या तिच्या सर्व अपेक्षा अन शांत केले जीवाला...

छोट्या अपेक्षांना तिच्या पंख नाही असे कळले...
स्वप्नाचे घर अन न संपणारे प्रेम हेच तिचे जीव्हाळे....

नको तिला सुख सोयरी गगनावरच्या तारांच्या...
सोने-चांदी तिच्यासाठी तर आहे धुलीकण वा-याच्या..

तीच्य छोट्या अपेक्षेतच वाटते प्रेम रस जीवनाचे...
देवा ! आता प्रत्यानांना यश दे माझ्या हेच मागाणे हृदयाचे .....   


@ Poonam Chand Varma  :)
@ Poonamchand V