Niyati

Started by dhanaji, January 25, 2016, 01:12:24 PM

Previous topic - Next topic

dhanaji


कळी म्हणते वाऱ्याला
असा माझा पदर खेचू नको
वारा सांगे कळीला ,
अशी बाळे लाजू नको. १
तुला तर फुलायला हवे ,
रंगाचे प्रदर्शन करायला हवे
,सुगंधाला हवेत पसरायला हवे,
भुंग्याला आवतन द्यायला हवे
भुंग्याचे पाय टोचून घ्यायला हवे,
परागकण एकमेकात मिसळायला हवे. .
नंतर मात्र गळून जाइल रंगीत पदर
आणी होईल  तुझे फळात रुपांतर
फळ पिकून होईल पिवळे
तेव्हां फळ खाली गळे
हा तर नियम धरतीचा
लागू होतो प्रत्येकाला
जोजोह्या धरतीचा

-- Unknown