तू गेलीस तेव्हा

Started by prathmesh_t, January 25, 2016, 09:20:26 PM

Previous topic - Next topic

prathmesh_t

तू गेलीस तेव्हा
रात्र प्रिय झाली
अंधाराची मिळालेली
साथ प्रिय झाली

तू गेलीस तेव्हा
भावनेला अर्थ न उरला
आठवणीत घालवलेला तेव्हा
तो काळही व्यर्थ ठरला

तू गेलीस तेव्हा
मन बोलू लागले
आयुष्यात गेलेली वेळ
स्वप्नात शोधू लागले

तू गेलीस तेव्हा
कविता एक सुचली
मनातील आग तेव्हा
अश्रु नी त्या विझली

- by  विशाल