बालपण

Started by Mayur Dhobale, January 26, 2016, 10:58:25 PM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

बालपण दे रे देवा...

वाटलं तेथे जावं ...
वाटलं ते पहावं...
वाटलं ते करावं..
वाटलं तर  सोडून द्यावं ...
वाटलं तर हसावं....
नाहीतर मनमुराद रडावं....
कारण त्या रडण्यातही एक मजा होती ....
रडल्या नंतर मिळणारी आईची माया,
लई लई भारी होती ...
लहान मोठा ...
नफा तोटा...
चांगलं वाईट ,
सरळ अन् ताईट...
मान अपमान ...
सार सारं हळुहळु कळलं ,
अन मग कुठं हर्षाकडून,
दुःखा कडे मन वळलं....
यश सारयांनाच असत हवं,
पण आम्हा चिमुरड्यांसाठी होत थोड नवं...
अपयश नकोच अस शिकलो,
मग मनात उमलली भिती....
नफा तोटा शिकलो अन्
लगेच लोभापायी बिघडली ना निती...
मानाच्या हव्यासापोटी जे नव्हतं करायचं तेही केलं ....
अन अपमानाच्या भितीपोटी जे मिळनार होत ते आधिच पळून गेलं.....
छान गोड ते बालपण शहाणपणाच्या नावाखाली ...
खुशाल  दडुन गेलं ...
खुशाल  दडुन गेलं .....

        -  मयुर  ढोबळे (https://www.facebook.com/Mazi-kavita-1505223896380307/))