प्रित

Started by गणेश म. तायडे, January 27, 2016, 08:23:50 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे



चित्त हरले गुंगले तुझ्या नयनी
विश्व रंगले दंगले तुझ्या आठवणी...
मोह सुटला नावरला तुझ्या सुंदरी
जिव जडला नडला तुझ्यावरी...
नजर छेदती भेदती माझ्या मनी
श्वास रोखला गुदमरला तुझ्या अंतरी...
प्रेम जाहले पाहले तुझ्या नयनी
स्वतः पाहतो सावरतो तुझ्या जिवनी...
स्वप्न पाहले राहले तुझ्या सोबती
बंध बांधले जोडले तुझ्या संगती...
प्रित जडली जुडली नवी नाती
गंध बहरला पसरला तुझ्या भोवती...
गुलाब फुलले उमलले तुझ्या ओठी
प्रेम भरले गहिवरले मना अंतरी...
चित्त हरले गुंगले तुझ्या नयनी
विश्व रंगले दंगले तुझ्या आठवणी...

- गणेश म. तायडे
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com