==* प्रेमवारा हा *==

Started by SHASHIKANT SHANDILE, January 28, 2016, 10:47:27 AM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

प्रेमवारा हा वाहुनी आला
हसवुनी हलके का रडवुनि मला गेला
प्रेमवारा हा वाहुनी आला
हसवुनी हलके का रडवुनि मला गेला

प्रेम वारा हा वाहुनी आला ~~

जेव्हा द्यायचेच होते हे काटे विरहाचे
प्रेमाच्या अश्रुचे
जेव्हा व्हायचेच होते दूर नाते हे माझे
प्रेमाने जपलेले
का मग हसवले मला असे का फसवले मला
माझ्या मनाचे का तुकडे हे केले
प्रेमवारा हा वाहुनी
देऊन स्वप्न नवे मग तोडुनि का गेला

प्रेमवारा हा ~~~~~

जेव्हा घ्यायचेच होते जीव माझे प्रेमाने
प्रेमाच्या खेडाने
जेव्हा प्यायचेच होते अश्रु आठवणींचे
प्रेमाच्या भोवतीचे
का मग सजविले असे दिसं का हरविले असे
तिला दूर काळजाशी मग का केले
प्रेमवारा हा वाहुनी आला
देऊनि ठेवा हा आठवणींचा का गेला

प्रेमवारा हा वाहुनि आला
हसवुनी हलके का रडवुनि मला गेला
प्रेमवारा हा वाहुनी आला
------------******------------
✒ शशिकांत शांडिले, नागपूर
Mo.9975995450
Its Just My Word's

शब्द माझे!