तुझं माझं नातं...!!

Started by Archana...!, January 28, 2016, 11:53:24 AM

Previous topic - Next topic

Archana...!

भारावलेला क्षण अन् बेभान थोड मन
स्पर्श तो तुझा जणू जाणवतो क्षणो क्षण..!!

हातात गुंतलेले हात,
तुझ्या डोळ्यांत पाहीलेली
माझ्या स्वप्नांनांची पहाट...!!

तुझ्या गच्च मिठीत विसावलेली मी,
विसरून सार्या जगाला
तुझ्यात सामावलेली मी...!!

सारचं कस अगदी स्वप्नांसम होतं
थोडस जगावेगळ अस तुझं माझं नातं...!!

अर्चना..!!  ;)