स्वप्न होतेना कधीतरी खरे ....?

Started by dhanaji, January 29, 2016, 06:17:33 PM

Previous topic - Next topic

dhanaji


स्वप्न होतेना कधीतरी खरे ....?
फार कमी दिसत असते ती
व्यापा तापात हरवून जाते ती
पूर्वी किती असायची
जेव्हा बघायचो तेव्हा हसायची
चक्क मस्त फुलायची
पण हल्ली हल्ली दिसतच नाही
ह्यालव केले की हाय करायची
शप्पत
पूर्वी खूप दिसायची ........
सध्या मीच कामात असतो
नको त्या व्यापात फसतो
मीच म्हणतो भेट गं
आली आली तरी
भेटणे मलाच अवघड जाते
शप्पत
बोलणे तर मुश्किल ...
भेटणेही शक्य नसते
निघालोच मी माझ्या देशात पुन्हा
कदाचित तेथेच भेट होईन
कालच मी भविष्य बघितलेय
खूप देशात भटकंने नशिबात आहे
कदाचित ह्या नाहीतर त्या देशात
भेटीचे योग असतील
चला नशिबात जसे असेल तसे होईल
भेट कोठेतरी नक्की होईल
कवितेशी माझे जुने नाते
येथे नाही तर तेथे
स्वप्न होतेना कधी तरी खरे....?

By Prakash Redgaonkar