प्रोग्राम अन् तू AWESOME AAHE NAAKI VACHA

Started by madhura, January 30, 2016, 07:17:32 PM

Previous topic - Next topic

madhura


' प्रोग्राम अन् तू '
रोजचच रडगाण तुझ
जमत नाही कसरत ताऱ्यावरची
अन् म्हणे ...
'होणार सुन मी ह्या घरची' ........
स्वप्न बघणे रोजचेच माझे
अपेक्षा करतात आडकाठी,
अवाढव्य,भौतिक हव तुला
कशा 'जुळून येतील रेशिमगाठी' ?.....
कसा मग जमेल
प्रेमातला व्यवहार ?,
गरजा भागवन्यासाठी मला
व्हाव लागेल 'जय मल्हार'.....
मलाही अविश्वास कधी कधी
खोटेही शब्द वाटे खरे
शंका आहेत अमर्यादित
अन् म्हणे 'नांदा सौख्य भरे'......
चालच अशी खेळतेस
काहीच नसतो पुरावा ,
अशानेच वाढतो संभ्रम मनाचा
म्हणे .. आपल्यात 'का रे दुरावा' ?.......
तुझे तर नेहमीच टिपिकल वागणे
हुंदक्यांची, दुःखाची रहदारी,
खुल्या मनाने बघ सगळीकडे
दिसेल 'दिल दोस्ती दुनियादारी' ,
वेळ येता लग्नाची म्हणे
मलाही श्वास घेऊ दया ,
निर्णय बदलतात भल्याभल्यांचे
डोक्याला शॉट नको 'चला हवा येऊ दया'


-- By किरण तोड़वळकर
२४.१.२०१६