तुझी आठवण तेवढी घेऊन जा

Started by Vinod Thorat, January 31, 2016, 01:53:49 PM

Previous topic - Next topic

Vinod Thorat

तुझी आठवण तेवढी घेऊन जा

तू गेलीस
तुझी आठवण मात्र तशीच ठेवून गेलीस मागे
माझ्या हृदयावर कोरलेली
एखाद्या शिलालेखासारखी
अगदी खोलवर कुठेतरी
तू परत येशील हि अपेक्षाही नाही आता
फक्त एवढंच कर
जमलंच तर एकदा येऊन जा
तुझी आठवण तेवढी घेऊन जा..

तुझी आठवण न काढायचा प्रयत्न केला तरी
उफाळून येते कधीतरी
पृथ्वीच्या पोटातील लाव्हासारखी
तुझा एखादा फोटो पाहून
तुझ आवडत गाणं ऐकून
अन आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन
जिथे घेतला होता तुझा हात हाती
माझ्या डोळ्यातल्या अश्रुंसाठी एवढंच कर
जमलंच तर एकदा येऊन जा
तुझी आठवण तेवढी घेऊन जा..

तुझ्या आठवणीने आताशा रडतही नाही मी
तुझ्या जाण्याचं दुःख पचवूनही टाकलंय मी
पण अश्रूंचा बांध कधी लोकांसमोर फुटायला नको
माझं प्रेम जगासमोर उघड पडायला नको
अन माझ्यामुळे तू बदनाम व्हायला नको
म्हणूनच सांगतो
जमलंच तर एकदा येऊन जा
तुझी आठवण तेवढी घेऊन जा..

- विनोद थोरात, जुन्नर
मोबा. 8983448219