शब्द नि:शब्द

Started by Chai85, January 31, 2016, 05:49:55 PM

Previous topic - Next topic

Chai85

                    शब्द नि:शब्द

का झाले रुष्ठ नुरला शब्दांचा आधार...
मनातील व्यथा मांडण्या कुणी द्या शब्द उधार...

सोबती होते तेंव्हा नच केली किंम्मत तयांची...
अपमानीले उधळीले बेपर्वा
पुजा करावी जयांची.

सोडूनी शब्दांचे तीर ह्रूदये कित्येक छेदिली...
मौनाच्या गर्द छायेने आता दिवस रात्र वेढिली...

विनविते तुम्हास मुक ओठांनी आणुनी डोळ्यांत प्राण...
नका दवडू व्यर्थ शब्दांचे ईश्वरी वाण...
                          -  चैत्राली जोशी