मी कशाला म्हणू देवा ..!

Started by Rajesh khakre, February 01, 2016, 01:32:37 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

मी कशाला म्हणू देवा
माझं तु भलं कर
वाटत असेल तुला काही
तुच काय ते बघ

मला तुझ्या हेतूवरती
नाहीच कधी शंका
म्हणून वाजवितो देवा
तुझ्याच नावाचा डंका

जीवनी या गरज जशी
तसे तु मला देतो
तक्रार नाही देवा माझी
तुझेच प्रेम स्मरतो

कधी कधी देवा मात्र
मीच कमी पडतो
खेद होतो मनी मला
मनात नुसता रडतो

माझं न् तुझं नातं देवा
एवढं घट्ट असावं
काही बुरं झालं माझं
तुलाच वाईट वाटावं
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com
( कविताचोरीचे वाढते प्रमाण बघता हल्ली जास्त प्रमाणात माझ्या कविता मी इकडे पोस्ट करत नाही.त्यामुळे ज्यांना माझ्या कविता नियमित image format मध्ये वाचायच्या असतील त्यांनी whatsapp वर विनंती पाठवावी.