स्त्री जन्माची हेळसांड

Started by pensword6, February 01, 2016, 05:24:29 PM

Previous topic - Next topic

pensword6

अत्याचाराचे गाठोडे काळजात दडवून
ती नेहमी गलिच्छ वस्त्यातून वावरणारी
स्त्री रक्तबंबाळ टाचांनी ...
आज हि फिरतेय निधड्या छातीने
राजकारण्यांची दारे ठोठावीत
घरोघरी न्यायाची भिक मागत ....
निर्भया बनून मरण्यापेक्षा
निर्भय बनून जगण्यासाठी ....
वेचतेय लाखो मुलींच्या अश्रुंचे मोती
अलगद आपल्या पापणीने ....
आणि श्वापदांचया  टोळ्या
आज हि पाहतात तिच्याकडे
मयत देहाचे लचके
तोडणाऱ्या कोल्ह्याप्रमाणे
patle tar comment kara....