प्रेमाचे सुर

Started by jaydeshmukh2@gmail.com, February 02, 2016, 01:05:31 AM

Previous topic - Next topic

jaydeshmukh2@gmail.com


सा निध्यात राहुन तिच्या प्रित त्याने जाणली होती,
रे शीमगाठ त्याने प्रेमाची तीच्यासोबत बांधली होती,
ग हीवरलेली दोन मनं आता एकमेकांत रुजत होती,
म स्तीत जगणारी ती पाखरं प्रेमवर्षावात भिजत होती,
प ण परंतुचा खेळ मात्र घात करत गेला,
ध रसोड वृत्तीचा राक्षस त्याला साथ देत गेला,
नी स्वार्थीपणातलं प्रेम आता शब्दांमध्येच गुंफलं होतं,
सा त सुरांचा चढाओढीत ते कधीच संपलं होतं

कवी
संदेश घारे, विक्रोळी

ramkishan dhangare