नोकरी करणाऱ्या व न करणाऱ्या सर्व महिलांसाठी अतिशय सुंदर कविता नक्कीच प्रत्येकाने

Started by madhura, February 02, 2016, 12:05:40 PM

Previous topic - Next topic

madhura


नोकरी करणाऱ्या व न करणाऱ्या सर्व महिलांसाठी .....
अतिशय सुंदर कविता नक्कीच प्रत्येकाने वाचा..


रात्र सरली, दिवस उगवला,
मोबाइलचा अलार्म आरवला,
सुर्यनारायणाचे दर्शन घ्यायला,
वेळच कुठंय् मला ?
मुलांना उठवा, डबा करा,
बसस्टापपर्यंत सोडवा चला,
मुलांचा गोड गोड पापा घ्यायला,
वेळच कुठंय् मला ?
सर्वांच्या नाष्टयाच्या प्लेट भरा,
पटकन लागा स्वयंपाकाला,
स्वतःच्या पोटात दोन घास ढकलायला,
वेळच कुठंय् मला ?
आठ वाजताचा सायरन झाला,
उशीरच होतोय ऑफिसला,
आरशात बघून नट्टापट्टा करायला,
वेळच कुठंय् मला ?
वेळेत घरी जाण्यासाठी,
कामाचा ढीग हवा लवकर उपसायला,
सख्यांशी हितगुज करायला,
वेळच कुठंय् मला ?
ऑफिस सुटले, बाजारहाट करा,
जीव तळमळतोय मुलांना भेटायला,
गाडीच्या ओव्हरस्पीड कडे बघायला,
वेळच कुठंय् मला ?
नवऱ्याला चहा, मुलांचा अभ्यास,
हवा देवापुढे दिवा लावायला,
संध्याकाळचा वॉक घ्यायला,
वेळच कुठंय् मला ?
रात्रीचा स्वयंपाक, उद्याची तयारी,
उशीरच होतोय झोपायला,
टिव्ही वरच्या मालिका बघायला,
वेळच कुठंय् मला ?
गोल गोल चक्रात अडकलेय मी,
गलेलठ्ठ पगार मिळवायला,
मात्र स्वतःसाठी खर्च करायला,
वेळच कुठंय् मला ?
लहान थोरांच्या दुखण्या-खुपण्याला,
रजा लागते आजारपणाला,
स्वतःचीच मात्र काळजी घ्यायला,
वेळच कुठंय् मला ?
कधीकधी वाटते, अकस्मात काळ येईल,
जेंव्हा देवाघरी न्यायला,
जरा थांब त्याला म्हणता,
म्हणेल तोही तेव्हा,
वेळच कुठंय् तुला ?
वेळच कुठंय् तुला ?


By Ameet Kshirsagar