व्याकूळ आळव

Started by विक्रांत, February 02, 2016, 07:07:16 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


तिथे जावूनिया 
परतून येणे 
घडू नये कधी
शोधितो ते पेणे ||१||

ऐसे ध्यानी मनी
म्हणून धावतो
जागोजागी साऱ्या
संता विचारितो ||२||

देवाच्या मिठीत
सरावे जीवित 
पंख जीवनाचे
हळूच मिटीत ||३||

कशाला असले
नकळे भोगणे
जगणे मरणे
येणे अन जाणे  ||४||

आपण आपुणा
देहात चिणणे
वेदना सोसत
उगाच रडणे  ||५||

नभाच्या कुशीत
धरेच्या उशीत
जाणावे गूढ या
जन्माचे गुपित  ||६||

व्याकूळ आळव
विक्रांत चित्तात
कधी भेटतील
प्रभू दत्त्नाथ ||७ ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
------------------------------------------------------